ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरणाच्या विरोधात 12 ऑक्टोबर पासून कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन #ordanance-factory-employee-on-strike - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरणाच्या विरोधात 12 ऑक्टोबर पासून कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन #ordanance-factory-employee-on-strike

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
आयुध निर्माणी खाजगीकरणाच्या विरोधात सरकारला वारंवार संघटनांनी सूचना व आंदोलन करून सुद्धा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने मजदूर युनियन, इंटर, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, मजूर संघ अशा चार संघटनांनी दिनांक 12 ऑक्टोंबर पासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.


वित्त मंत्री यांनी 16 मे ला घोषणा करून भारतीय रक्षा मंत्रालय संल्गनीत असलेल्या 41 आयुध निर्माणीचा खासगीकरणाचा निर्णय घेतला यापूर्वीचे रक्षामंत्री जॉर्ज फर्नांडिस, प्रणव मुखर्जी, ए के अँटोनी . मनोहर पर्रिकर यांनी आयुध निर्माणीचे खाजगीकरण होणार नाही असेल लिखित आश्वासन दिले होते यांनी दिलेल्या आश्वासन व समझोत्याचे उल्लंघन सरकार कडून करण्यात येत आहे.
आयुध निर्माणी चे खाजगीकरण झाल्यास देशाची सुरक्षा धोक्यात येईल यासाठी भारत सरकार चे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, रक्षा मंत्री, रक्षा स्टॉप यांचे प्रमुख आणि रक्षा संसदीय स्थाइ समितीचे अध्यक्ष यांना खाजगीकरण करण्यात येऊ नये याबाबत आपण पुनर्विचार करावा यासाठी असंख्य पत्र विविध संघटना मार्फत पाठविण्यात आले. 
आता या प्रयत्नांचा उपयोग होत नसल्याचे लक्षात घेता आयुध निर्माणी येथे काम करणाऱ्या कामगारांचे हित लक्षात घेता येथील मजदूर युनियन, इंटर, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, व स्वतंत्र मजूर संघ अशा चार संघटनांनी दिनांक 12 ऑक्टोंबर पासून बेमुदत हडताल करण्याचा निर्णय घेतला असून या हडताली मध्ये 99% कामगारांनी पाठिंबा दर्शविला आहे.