'त्या' नरभक्षक वाघाचा बंदोबस्त न केल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा : वर्षाभरात 10 शेतकऱ्यांना या वाघाने केले ठार : मानवी मांस खानारा हा वाघ ठरतोय अपवाद #tiger-attack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

'त्या' नरभक्षक वाघाचा बंदोबस्त न केल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा : वर्षाभरात 10 शेतकऱ्यांना या वाघाने केले ठार : मानवी मांस खानारा हा वाघ ठरतोय अपवाद #tiger-attack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

तालुक्यातील वन परिक्षेत्र, राजुरा व विरूर (स्टे.) अंतर्गातील गावांमध्ये नरभक्षक वाघाने धुमाकुळ घातला असून मागील वर्षाभरात 10 शेतकऱ्यांना नाहक प्राण गमवावा लागला. या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने वन प्रशासनाला दिला आहे.उपविभागीय वन अधिकारी यांना निवेदन देऊन हा इशारा देण्यात आला असून यावेळी समितीचे सदस्य चेतन जयपूरकर, मल्लेश आत्राम, भाग्यश्री आत्राम, निलेश राऊत, सुभाष साळवे, चारणदास तोडासे, शंकर धनवलकर आदींची उपस्थित होती.
टेंबूरवाही, सिर्सी, खांबाळा, तुलाना, नवेगांव. सोनुली, केळझर, चिंचोली, कविठपेठ, धानोरा, सिंधी, नलफडी व विहीरगाव भागातील शेतकऱ्यांना शेतात जाणे व शेतीचे काम करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. परिसरात १६ जानेवारी, २०१९ पासून आजपर्यंत २२ महिण्याच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक शेतकरी वाघाच्या हल्यात गंभीर जखमी झाले. काही शेतकऱ्यांना तर कायमचे दिव्यांगत्व आले आहे. वाघाच्या भितीने अन्य वन्य प्राण्यांचा गावालगतच्या शेतात संचार वाढला असल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. यामुळे वन विभागानी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा शेतकन्यांकडून वन विभागाच्या कार्यालयासमोरील मुख्य मार्गावर दिनांक १२ ऑक्टोंबर ला लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे.