खरीप हंगाम 2020-21 या हंगामातील सोयाबीन साठी शासनाने प्रती क्विंटल हमीभाव 3 हजार 880 रूपये जाहीर केला आहे. किमान किंमत आधारभूत योजनें अतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांना नोंदणीकरता येणार आहे.
खरेदीला सुरुवात 15 ऑक्टोबर 2020 पासून होणार आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनआवक बाजारात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, बाजारभाव हमीभावापेक्षा कमी मिळतो.
त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. कोरोनाच्यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गर्दी टाळूनये, यासाठी 1 ऑक्टोबर 2020 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.
राज्य सरकारने केंद्र शासनाकडे हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याच्या मान्यता प्रस्ताव 18 सप्टेंबर 2020 ला पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
नोंदणी केलेल्या केंद्रावरून एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमाल घेवून याचा सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकयांनी तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.
नोंदणीकरिता आधारकार्डची छायांकित प्रत, पिकपेरा नोंद, सातबारा उतारा सादर करताना खरेदी केंद्रावर मोबाईल क्रमांक नोंदवावा. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारी नुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे.