राजुरा शहर युवक काँग्रेसचे केंद्रातील मोदी सरकारकडे रोजगार दो.!!!..मागणीचे तहसीलदार साहेबाना निवेदन #youth congress - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा शहर युवक काँग्रेसचे केंद्रातील मोदी सरकारकडे रोजगार दो.!!!..मागणीचे तहसीलदार साहेबाना निवेदन #youth congress

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


दि. ८/९/२०२० ला युवक काँग्रेस कमिटी राजुरा यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे रोजगार दो....मागणीचे निवेदन राजुरा तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबाना दिले.

केंद्रातील मोदी सरकार युवकांसाठी वर्षाला २कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले.पण परिस्थिती मात्र वेगळीच आहे.

नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघु ,मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटा बसला.त्याची परिणीती म्हणजे करोडो रोजगार नष्ट झाले.वस्तू सेवा कराच्या कुटीर,व लघु मध्यम क्षेत्राचे आणि उद्योग धंद्याचे पार कंबरडे मोडले.याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्ठ्या प्रमाणात वाढली.पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख करोडाच्या पैकेज मधून बेरोजगार युवक,शेतकरी व लघु ,मध्यम उद्योग क्षेत्र यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही.पंतप्रधान मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जाणून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे.युवक हे निराश झाले आहेत,आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची स्वतःची जबाबदारी ढकलून चालणार नाही.तरुण हाताना काम हवे आहे!मोदी सरकारकडे आमची मागणी एकच आहे, रोजगार दो!या बाबतचे निवेदन तहसीलदार साहेब राजुरा याना युवक काँग्रेस कमिटी राजुरा शहर यांनी दिले.निवेदन देत असताना, अशोक. राव. शहर अध्यक्ष,युवक काँग्रेस राजुरा. जगदीश बुटले, ग्राम पंचायत सदस्य रामपूर, निरंजल मंडल सोनिया नगर वॉर्ड अध्यक्ष, सुजान मंडल,सय्यद शाहिद भारत चौक वॉर्ड उपाध्यक्ष सहित आदींनी निवेदन दिले.