WHO चे जागतिक तज्ज्ञ डॉ. अरुण हुमणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे नवे अधिष्ठाता : डॉ. मोरे यांच्या वादग्रस्त जागेवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती प्रक्रियेतुन केली नवी नियुक्ती #dr.-arun-humane - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

WHO चे जागतिक तज्ज्ञ डॉ. अरुण हुमणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे नवे अधिष्ठाता : डॉ. मोरे यांच्या वादग्रस्त जागेवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती प्रक्रियेतुन केली नवी नियुक्ती #dr.-arun-humane

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांची कारकीर्द सफाई कामगारांचे वात्रत कंत्राट व कोरोना नियंत्रणातील अव्यवस्थेने गाजली. 
त्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या सततच्या तक्रारीनंतर डॉ. मोरे यांना हटविण्याची सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मागणी केली होती. 
त्यानंतर या वादग्रस्त जागेवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतून डॉ. हुमणे यांची निवड केली आहे. त्यामुळे आता डॉ. अरुण हुमणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता म्हणून नियुक्त झाले आहेत.
दरम्यान, डॉ. हुमणे लवकरच पदभार स्वीकारण्याची शक्यता असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसोबत इतर रुग्णांची होणारी हेळसांड कशी नियंत्रणात आणतील याकडे सर्वांचे लक्ष राहील. 
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक, विभागप्रमुख डॉ. अरुण हुमणे यांची यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तज्ज्ञांचे मॉनिटरिंग युनिट या अभियानात अभियानात राष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून सरकारद्वारे नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थेतर्फे निवड  पाच वर्षांपूर्वी केली आहे.