जि प सदस्याच्या वडिलांकडून रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम.... नागरिकांचा आक्षेप :- उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली बांधकाम हटविण्याची मागणी #wani - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जि प सदस्याच्या वडिलांकडून रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम.... नागरिकांचा आक्षेप :- उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली बांधकाम हटविण्याची मागणी #wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी :- सुरज चाटेराजूर कॉलरी येथील वार्ड क्र. ३ मध्ये राहणारे श्री सुधाकर भगत यांच्या घराचे बांधकाम सार्वजनिक रस्त्यावर आल्याने वार्डातील नागरिकांनी अतिक्रमण करून केल्या जात असलेल्या बांधकामावर आक्षेप घेऊन हे अतिक्रमित बांधकाम हटविण्याची मागणी केली आहे. वर्तमान सरपंच सौ. प्रणिता मो. असलम आणि जिल्हा परिषद सदस्य श्री संघदीप भगत ह्यांचे अतिक्रमित धारक वडील असल्याने हे अतिक्रमण हेतुपुरस्सर केल्याचा आरोप उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 4 ला दिलेल्या निवेदनात केला आहे.श्री सुधाकर भगत हे सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य यांचे वडील असल्याने व जिल्हा परिषद सदस्य त्याच घरात राहत असल्याने हेतुपुरस्सर वार्डातील नागरिकांच्या जाण्यायेण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून नियमांची ऐसी तैसी करून किंवा नियमांना धाब्यावर बसवून पदाचा गैरवापर करून बांधकाम केल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गावातील नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणे व त्यांना चांगल्या सोई सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच पदाच्या दुरुपयोग करीत, आपल्याच घरच्यां कडून नियमांना केराची टोपली दाखवीत व कर्तव्याला न जुमानता स्वतःच अतिक्रमण करीत असतील तर रक्षण कर्तेच भक्षक झाले अशी म्हणायची वेळ आल्याचे दिसून येते.
सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून करण्यात आलेले बांधकाम बंद न झाल्यास नियमित येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या रस्ता बंद होऊन गैरसोय निर्माण होईल व जनतेला दैनंदिन कामांसाठी नाहक त्रास सहन करावा लागेल, करीता ताबडतोब हे अतिक्रमण हटवून जनतेला होणारी गैरसोय टाळावी अशी विनंती व मागणी उपविभागीय अधिकारी वणी, राजूर ग्रा पं सरपंच, सचिवांकडे केली आहे. पदाधिकारीच यामध्ये गोवले गेले काय? मग आहे तर कधी व कशी कार्यवाही केल्या जाते? याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. निवेदनावर ज्ञानेश्वर तेलंग, संजय पाटील,अजय भुसारी, नदीम शेख,असित तेलंग, वसंत पाटील,पंजाब भगत, हरिभाऊ अंबादे, देवेंद्र गजभिये,राकेश चिमुरकर,कुंदन भगत, युगंधर गजभिये,सागर नगराळे,मो. नूर शेख, विक्की यादव, अक्षय खोब्रागडे आदी लोकांच्या सह्या आहेत.