वणीचे विद्यमान आमदार बोदकुरवार यांना कोरोनाची लागण.... वणी विधानसभा :- कोरोनाचा पारा वरचढच.#wani - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वणीचे विद्यमान आमदार बोदकुरवार यांना कोरोनाची लागण.... वणी विधानसभा :- कोरोनाचा पारा वरचढच.#wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी :- सुरज चाटे 


जगभरात कोरोनाचा मोठा हाहाकार सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहे, शासन सुद्धा युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे त्यातच वणीसह विधानसभा क्षेत्राचा आकडा मात्र वरचढच दिसत आहे त्यातल्या त्यात वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून सध्या ते नागपूर येथील दवाखान्यात उपचार घेत आहे. वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना कोरोनाची लागण झाली असून, बुधवारी 23 सप्टेंबर रोजी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे. सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी आमदार बोदकुरवार यांना ताप आला, मात्र त्यांनी मंगळवारी वणीत डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. त्यांनी तातडीने नागपूर येथे उपचारासाठी जाण्याचा निर्णय घेतला, बुधवारी ते नागपुरच्या सेवनस्टार हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. ती पॉजिटिव्ह आली. त्यामुळे सदर दवाखान्यात ते उपचार घेत आहे.
⛔️ सावधान अजून धोका टळलेला नाही

कोरोनाला गमतीत न घेता दिलेल्या नियमांचे पालन करण्याची गरज निर्माण झाली असून काही ठिकाणी भरती करण्याकरिता बेडसुद्धा उपलब्ध नाही त्यामुळे शासनाकडून नियम पाळण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असून नागरिकांनी नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे कारण सावधान अजून धोका टळलेला नाही.