वणीतील खळबळा परिसरातील जावेद शेख वय अं 25 वर्ष याला विजेचा झटका लागून दिनांक 05 च्या पहाटे म्हणजेच मध्यरात्री शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिरपूरच्या समोरील जंगलात चालू रोहित्राचा शॉर्ट लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सध्या कोरोनासारख्या भयावह स्थिती सुरु असून त्यातच दिनांक 5 च्या पहाटे जी घटना घडली त्यामुळे वणीसह परिसरातील नागरिक हैराणच झाले आहे.
खळबळा परिसरातील 25 वर्षीय युवक नामे जावेद शेख हा घरातून काही कामानिमित्य निघाला असता शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात एका डीपी जवळ त्याला त्या चालू रोहित्राचा तीव्र झटका बसल्याने त्याचा मृत्यू झाला, त्याचे शव विच्छेदनासाठी वणी येथे आणण्यात आले असून, मात्र घटनास्थळाहुन त्याच्या सोबत असलेल्या साथीदाराने शिरपूर पोलीस स्टेशन ला माहिती दिल्यावरून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
नेमकं यांना तिथे कोणते काम असावे? असा तर्क वितर्क काढण्यात येत असून एवढ्या रात्री काम काय? हेच कळेनासे झाले आहे, जर चोरी करण्याकरिता जर गेले तर मग चोरी करण्याचा डाव जीवावर बेतला? असाच तर्क वितर्क निघत असून मात्र जावेदचा मृत्यू विजेच्या झटक्याने झाला आहे, तरी तो तिथे कशासाठी गेला असावा? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.