लाखोंचे सागवान जप्त : घरात ठेवले होते साठवून #teakwood - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लाखोंचे सागवान जप्त : घरात ठेवले होते साठवून #teakwood

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती -


सोमवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक,मध्य चांदा वनविभाग अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शना खाली फ. अ.गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी,फिरते पथक व फिरते पथकाचेकर्मचारी आणि वनसडी वन परिक्षेत्राचे कर्मचारी मिळून आसन गावातील बाळू चंदनखेडे यांच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता एकूण-१४ नग अवैध सागवन सिलपाट घरात साठवूनठेवले होते. सर्व अवैध वनोपज पंचांसमक्ष पंचनामा करुन जप्त करण्यात आले, व भारतीय वनअधिनियम-१९२७ च्या कलम२६(१)(इ), २, ४१,४२,५२ व६९ अन्वये वनगुन्हा क्रमांक ३२/७ नोंदविण्यात आला. सदरकार्यवाहीत फिरते पथकाचे वनपालआ.बा. कुरेकार, वनरक्षक बी. के.पेंदोर, गणेश बनकर, पोलिस शिपाई अलिजान आलम,क्षेत्रसहायक वनसडी गणेश जाधव,वनरक्षक स.दा. ब्रांडे व वाहनचालक जी.एच. कोटनाके सहभागी होते. पोलीस पाटील शांताराम कनू  पायघन यांचे सहकार्य लाभले.