खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर प्रतिनिधी -
नेरी प्रतिनिधी - चिमुर तालुक्यातील नेरी वरून जवळच असलेल्या शिवनपायली येथील सूरज घोनमोडे वय 22 वर्षे या युवकाने विहिरीत उडी मारून जीवन यात्रा संपविली 21 sept सोमवार पासून हा युवक बेपत्ता होता.
सगळी कडे शोधाशोध केली परंतु कुठेही त्याचा थांगपत्ता लागला नाही अखेर 23 सप्तेबंरच्या सकाळी त्याचे प्रेत घराच्या बाजूला असलेल्या विहिरीत तरगंताना दिसला तेव्हा लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली.
प्रेत विहिरीतून काढुन उत्तरीय तपासणी ला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले सदर तरुण हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली सदर पुढील तपास नेरी पोलीस चौकी चे इंचार्ज पी एस आय कीरन मेश्राम सर करीत आहेत.