तालुक्यातील आवळगाव येथील जंगलात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मतक युवकाचे नाव आतिष नामदेव दुमाने वय वर्षे 20 असे असून आवळगाव येथील रहिवासी आहे.
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की,मृतक नामदेव हा दिनांक:- 20/09/2020 ला घरून 3:00 वाजता घरच्या कोणत्याही व्यक्तीला न सांगता सायकल पकडून जंगलात गेला.रात्र होत चालली मात्र नामदेव अजूनही घरी का नाही आला म्हणून वडील त्याचा शोधा शोध करू लागला.
रात्र निघुन गेली मात्र नामदेवचा थांगपत्ता लागेना.दि. 21/09/2020 ला सकाळी पूर्वरत गावातील काही व्यक्तीना सांगून जंगलामध्ये नामदेवचा शोध सुरू केला असता एका झाडाला नामदेव हा गळफास घातला दिसून आला.लगेच ही माहिती संबंधित पोलीस विभागाला कळविण्यात आली.व शवाला शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.
मृत्यूचे कारण अजूनही कळले नसून घटनेचा पुढील तपास संबधीत पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहे.
नामदेवच्या कुटुंबात एकूण चार जण असून नामदेव हा कुटुंबातील कर्ता युवक होता.नामदेवच्या जाण्याने दुमाने कुटुंब व गावपरिसर शोकसागरात बुडाला आहे.