आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी युवा मोर्चा चा भक्तिभाव :कोरोना आजारातून लवकर बरे व्हावे याकरिता जिल्ह्यात युवामोर्चा तर्फे हनुमान चालीसा पठण, हवन व पूजा अर्चना संपन्न #sudhir-mungantiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी युवा मोर्चा चा भक्तिभाव :कोरोना आजारातून लवकर बरे व्हावे याकरिता जिल्ह्यात युवामोर्चा तर्फे हनुमान चालीसा पठण, हवन व पूजा अर्चना संपन्न #sudhir-mungantiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -


आज दिनांक 22/09/2020 रोजी महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आरोग्य निरोगी रहावे व कोरोना आजारातून भाऊ लवकर बरे होऊन स्वस्थ व दीर्घायू व्हावे याकरिता चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष श देवरावजी भोंगळे व भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला.



क्षेत्रातील  गावात आपापल्या परिसरातील हनुमान मंदिर मध्ये जाऊन हनुमान चालीसा पठाण करून सुधीर भाऊंना कोरोना आजारातून बरे व्हावे याकरिता सर्वांनी पूजा-अर्चना केली.



बल्लारपूर मध्ये रुद्र चंडी यज्ञ करण्यात आला यामध्ये जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये हनुमान चालीसा पठण हा कार्यक्रम राबवण्यात आला.
 


याप्रसंगी भाजयुमो जिल्हा महामंत्री आशिष देवतळे, भाजयुमो जिल्हा महामंत्री महेश देवकते,आशिष ताजने, प्रशांत येल्लेवार, राकेश पून, मनीष वासमवार, इम्रान खान, महेश श्रीरंग, प्रवीण मोहुर्ले, रामलालजी डोनाडकर, सुयोग बाळबुधे, सचिन डोहे, सचिन शेंडे,रोहन काकडे, अजय मस्के,मोहन चलाख,भैरव दिवसे, किशोर मुंगले, सुरज धात्रक, मोहन कलेगुरवार, महेश कोलावार तसेच समस्त जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शविली व भाऊंच्या स्वस्थ जीवनाकरिता प्रार्थना केली.