सुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी; राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी #State ban on sale of single cigarettes and bidis; open cigarettes and bidis are now banned anywhere in the state # - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी; राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी #State ban on sale of single cigarettes and bidis; open cigarettes and bidis are now banned anywhere in the state #

Share This
खबरकट्टा / मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी १७ हजार ७९४ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाल्याने एकूण रूग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली. तर, सध्या २ लाख ७२ हजार ७७५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानूसार, राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगरेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे. व्यसनांकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठी हा आदेश काढल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आदेशाची कठोर अंमजबजावणी करण्याचे आदेश देखील सरकारने पोलीस आणि महापालिकेला दिले आहे.
पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे 'धोक्याची कल्पना' हा साध्य होतो. मात्र तेच सुटी म्हणजे सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही. आरोग्य विभागाचे हे म्हणणे विधी व न्याय विभागाने आता करोनाच्या पार्श्वभूमीवर मान्य केले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
⛔️ ई- सिगारेटवरही केंद्र सरकारने घातली आहे बंदी-

केंद्र सरकारने याआधी 'ई-सिगारेट'चे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 19 सप्टेंबर 2019 रोजी या निर्णयाची घोषणा केली होती. धूम्रपान रोखण्यासाठीचा पर्याय म्हणून 'ई-सिगारेट'कडे पाहिले जात होते; परंतु, त्यात अपयश आल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.