SP कार्यालयात कोरोनाचा शिरकाव : 3 दिवस कार्यलय बंद राहण्याची शक्यता :🪀 डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या बदलीची निव्वळ अफवा #covid-19 positive found at spchandrapur office - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

SP कार्यालयात कोरोनाचा शिरकाव : 3 दिवस कार्यलय बंद राहण्याची शक्यता :🪀 डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या बदलीची निव्वळ अफवा #covid-19 positive found at spchandrapur office

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील काही पोलिस कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय तीन दिवसांकरिता बंद करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. 


जिल्हाधिकारी कार्यालय,महानगरपालिका,जिल्हा परिषद व जिल्हा कारागृह नंतर आता थेट पोलिस खात्यातील सर्वेसर्वा असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यालयात कोरोना नी दस्तक दिल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त महितीनुसार पोलिस अधीक्षक कार्यालय 3 दिवसांकरिता बंद करण्यात आले असून कोणालाही आत जाण्याची परवानगी नसणार आहे.संपूर्ण कार्यालय व कार्यालय परिसर सैनिटाइज करण्याचे काम सुरु झाले आहे.


🪀 चंद्रपुर चे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची नाशिक येथे बदली झाली असल्याच्या अफवांच्या बातम्या सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत. अद्याप असा आदेश आलेला नसून या फक्त अफवा आहेत, याला डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यानंतर आता पोलीस अधीक्षक यांची बदली होणार या चर्चेला उधान आले होते. मागील दोन दिवसांपासून सोशल माध्यमांवर नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी चंद्रपूरचे डॉक्टर रेड्डी यांची बदली झाल्या असल्याचे वृत्त झळकु लागले. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थिती बघता पोलीस अधीक्षकांच्या बदलीला काही दिवसांसाठी स्थगिती मिळावी असे जनसामान्यांमध्ये बोलल्या जात आहे. अधिकाऱ्यांची बदली होणे हा कार्यप्रणालीचा एक भाग असतो. काही अधिकारी आपल्या कर्तुत्वाने सामान्यांवर एक वेगळी छाप सोडून जातात त्यामुळे त्यांची बदली सामान्यांना दुखावणारी असते, असाच काहीसा अनुभव चंद्रपूर जिल्हावासियांना यापूर्वी आलेला आहे. दोन दिवसापासून पोलीस अधीक्षक त्यांची बदली झाली असल्याच्या बातम्या या अफवा असून डॉ. माहेश्वर रेड्डी यांची बदली झाली नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.🔴 चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.  

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴