आज सकाळी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान विषारी सपाने दंश केल्याने कु. वृषाली दिगांबर शेन्डे (३ वर्ष) मु. झिलबोडी ही गंभीर अवस्थेत आहे.
प्राप्त माहितीनुसार ३० आॅगस्टला आलेल्या पुराने दिगांबर शेन्डे यांच्या घराला पुराने वेढले होते व पुराचे पाणी घरात घुसले होते. त्यामुळे आजुबाजूच्या क्षेत्रात साप, विन्चुनी आदी प्राणी दिसून येत होते.
सोमवार, ०७ सप्टेंबरला झिलबोडी येथील रात्रभर वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे पट्टेरी मन्यार जातीच्या सापाने वृषालीस पहाटे ४ वाजताच्या दरम्यान दंश केला. लाईट नसल्यामुळे व मुलगी लहान असल्यामुळे सापाने दंश केल्याची बाब तात्काळ लक्षात आली नाही. काही वेळाने पायाला सुज आली व रक्त बाहेर येत असल्याने साप चावल्याचे समजले.
तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर वृषालीला ख्रिस्तानंद रूग्णालय, ब्रम्हपुरी येथे दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.पुरजन्य स्थिती व वीज वितरण कंपनीचे नाकर्तेपण यामुळे वृषालीला संकटाचा सामना करावा लागत आहे.