ब्रेकिंग : सावली नगरपंचायत मध्ये कोरोना चे रुग्ण: मुख्याधिकारी झाले बाधीत नगरपंचायत केले बंद #saoli - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : सावली नगरपंचायत मध्ये कोरोना चे रुग्ण: मुख्याधिकारी झाले बाधीत नगरपंचायत केले बंद #saoli

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली :


सावली शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून शासकीय कार्यालये ही बाधीत होत आहे. आत्तापर्यंत तहसिल कार्यालय,ग्रामीण रुग्णालय,पंचायत समिती,भूमी अभिलेख कार्यालय,असोला मेंढा नूतनीकरण विभाग मध्ये कोरोना ने दस्तक दिली.



आता नगरपंचायत मध्ये कोरोना बाधीत ची संख्या वाढत असून आज चक्क मुख्यधिकारी यांचा ही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली असून नगरपंचायत सीलबंद करण्यात आलेला आहे.




नागरिकांनी सजग राहावे असे आव्हान अनेक दिवसांपासून प्रशासन करीत आहे मात्र या कडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.सद्या जनता कर्फ्यु आहे.




शहरातील सर्व व्यापार हा बंद आहे.मात्र चहा व जीवनाश्य्क वस्तू मिळत नसून परंतू दारू व खर्रा सर्रास मिळत आहे आणि विनाकारण फिरणारे तसेच गाड्या व हुल्लळबाज युवकांची संख्या ही वाढत आहे मात्र पोलीस प्रशासन हे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.