पुराचे पाणी ओसरले म्हणून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याला करंट लागल्याने जागीच ठार -#saoli - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुराचे पाणी ओसरले म्हणून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याला करंट लागल्याने जागीच ठार -#saoli

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली प्रतिनिधी -


वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी टाकल्याने सावली तालुक्यात नदी काठावरील सर्वत्र हाहाकार माजला आहे. 


सावली तालुक्यातील अनेक शेती पाण्याखाली आहे.आज थोडा पूर ओसरला म्हणून सामदा येथील प्रगतशील शेतकरी रुपेश बुरले वय 40 वर्ष हे शेतात गेले. याचा संपूर्ण शेत पाण्याखाली होता तसेच मोटार पंप सुध्दा बुडून होता. 


पाळीवर असलेले छोटे झाड तोडले.व त्या झाडावरील मोटार पंप च्या वायर ला उचलून बाजूला ठेवतो म्हणून हात लावताच त्यांना जोरदार करंट लागला व ते जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी 8 च्या दरम्यान घडली.घटनेची माहिती पोचताच शेकडो लोक घटनास्थळी पोहचले. 

या घटनेचा सर्वत्र विलाप सुरू असून एक उमदा शेतकरी हरपल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली असून या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आलेली आहे.