चार महीन्यापासुन अंध अपंगाचे पगार न झाल्याने निराधारांवर उपासमारीची पाळी #sanjay-gandhi-niradhar-yojna - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चार महीन्यापासुन अंध अपंगाचे पगार न झाल्याने निराधारांवर उपासमारीची पाळी #sanjay-gandhi-niradhar-yojna

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : प्रतिनिधी -


चिमुर तालुक्यात व्रुद्धापकाळ,निराधार अंध अपंग यांचे पगार चार महीन्यापासुन न झाल्याने त्याचेवर उपासमारीची पाळी आली आहे.चिमुर तालुक्यात निराधार पगार धारकांची संख्या बरीच आहे लाँक डाउन मुळे सर्व कामधंदा बंद आहे कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांना काम मिळेणासे झालेले आहे ह्यातच निराधारांचे चार महीन्यापासुन पगार झाले नसल्याने त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे निराधार बँकेच्या चकरा मारत असतानी दिसत आहेत पण अजुनही मे,जुन,जुलै,आगष्ट या चार महीन्याचे पगार झाले नाही.
त्यामुळे निराधार मोठ्या संकटाचा सामना करीत आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे त्यामुळे या समस्येकडे शासनाने लक्ष देवुन निराधारांचे पगार लवकरात लवकर करावे अशी मागणी होत आहे.
कोरोणा महामारीमुळे निधी आला नाही विलंब झाला परंतु एक मेल आला आहे त्यामध्ये चार पाच दिवसात निधी उपलब्ध होवून निराधारांचे पगार होणार आहेत - तहसीलदार संजय नागतिलक , चिमुर


🔰क्लिक करा - सामील व्हा खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये व वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या