चारचाकी वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षक जागीच ठार #road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चारचाकी वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षक जागीच ठार #road accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -



आरमोरी रोड उदापूर स्टेट बँक जवळच नाग मंदिर समोर अज्ञात वाहनाने दुचा कीला मागेवून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना आज 16 सप्टेंबर रोजी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास घडली.दिनेश काळे (40) रा. ब्रम्हपुरी असे अपघात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार मृतक दिनेश काळे हा रामदेवबाबा साल्वंट येथे सेक्युरिटी गार्ड असून याचा रोजच्या वेळेप्रमाणे रात्रौ 7 वाजता आपल्या ड्युटीवर जात असतांना रात्री 7 ते 7.30 दरम्यान आपल्या यामाहा एमएच 31 डी जे 4517 क्रमांकाच्या दुचाकीने ड्युटीवर जात असतांना 7 ते 7.30 दरम्यान आरमोरी मार्गे भरधाव वेगाने चारचाकी वाहनाने दिनेश काळे याला पाठीमागेऊन जबर धडक दिली व मुख्य रस्त्यावर जाउन पलटी मारली. 


या धडकेमध्ये दिनेश काळे यास डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला खासगी वाहनाने ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपूरी येथे भरती करण्यात आले असता डाॅक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषीत केले. 



दिनेश च्या अपघाती मृत्यूने ब्रम्हपुरी येथे हळहळ व्यक्त केल्या जात असून त्याच्या पच्छात पत्नी,मुलगा असा बराचा मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा अधिक तपास ब्रम्हपुरी पोलिस उप निरीक्षक अश्विन खेडीकर इतर पोलीस करीत आहे.