राजुरा आगारातील कोडशी बु हे गाव शेवटच्या टोकावर वसलेले सर्वांधिक जुने गाव आहे.कोडशी बु गावात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे एकही बससेवा उपलब्ध नाही त्यामुळे राजुरा-कोरपना-कोडशी बु बससेवा सुरु करा अशी मागणी भाजपा नेते सतीश धोटे यांच्या माध्यमातून भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी राजुरा आगार प्रमुख आशिष मेश्राम यांच्याकडे केली आहे.यावेळी कोडशी बु येथील उपसरपंच बंडू वासेकर,सत्यवान चामाटे, दीपक झाडे उपस्थित होते.
सदर गावाच्या परिसरात तांबाडी,गांधीनगर, तुळशी हे गावे येतात परंतु एकही बसेवा सुरू नाही त्यामुळे येथील नागरिकांना व प्रवाश्यांना खाजगी वाहतूकिने प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्याकडे बससेवा सुरू करण्याबाबत मागणी केली होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी राजुरा आगार प्रमुख आशिष मेश्राम यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सदर बससेवा राजुरा वरून कोडशी बु करीता सकाळी 9 वाजता व सांयकाळी 4 वाजता सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आपण यावर लवकरच उचित कार्यवाही करून बससेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असे आगार प्रमुख आशिष मेश्राम यांनी सांगितले.