चंद्रपुर जिल्ह्यातील नारंडा येथे पुन्हा सुरू होत असलेल्या मुरली सिमेंट (दालमिया भारत) कंपनीमध्ये जुन्या व स्थानिक कामगारांना प्राधान्याने रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे भारतीय सिमेंट मजदूर संघाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
राजुरा (धोपटाळा) येथे भारतीय सिमेंट मजदूर संघाची शाखा नारंडाची कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीत जिल्हाध्यक्ष शैलेश मुंजे,भाजपा नेते सतीश धोटे,भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने, उपाध्यक्ष किशोर राहुल,बंडीवारजी,प्रमोद लोनगाडगे यांची उपस्थिती होती.
सदर बैठकीत मुरली सिमेंट कंपनी(दालमिया भारत) मध्ये जे जुने व स्थानिक कामगार काम करत होते त्यांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा बैठकीत निर्णय घेण्यात आला तसेच दालमिया भारत सिमेंट कंपनीच्या प्रशासनाची बोलणी सुरू आहे.तसेच कामगारांच्या हितासाठी सदैव झटत राहू.
तसेच काही कामगार संघटना हे भारतीय मजदूर संघाशी संलग्नित आहो म्हणून कामगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे,परंतु आम्ही तश्या कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आवाहन जिल्हाध्यक्ष शैलेश मुंजे यांनी केले आहे.
या बैठकीत सत्यवान चामाटे, रामरूप कश्यप,अजय खामनकर,प्रवीण झोडे,मंगेश चांदेकर,डेबूजी मानापुरे,पारस वाढई,राजू गोहणे, संजय चाहानकार उपस्थित होते.