अनेक वर्षे एका पक्षासाठी आपले तन , मन, धन, अर्पण करून मराठी तरुणांसाठी व कामगारांसाठी झटत असताना पक्ष श्रेठीन कडून न्याय न मिळत असल्यामुळे तथा आंदोलनांना वरून पाठबळ मिळत नसल्याने समर्थकांच्या म्हणण्यावरून नुकत्याच झालेल्या 2019 च्या विधानसभेमध्ये पक्ष परिवर्तन करून एका अपक्ष आमदारांच्या पक्षात प्रवेश घेतलेल्या एका महत्वाकांक्षी तरुण नेता.
या ही नेत्याकडून कामगारांची प्रश्न मिटविण्यासाठी फक्त पत्र देण्यापुरतीच मदत मिळत असल्याने कामगारांची व शेतकऱ्यांची नाराजी पाहता त्याने त्याला आधीपासून संपर्कात असलेल्या एका धनाढ्य अपक्ष महिला खासदार यांची ऑफर लवकरच स्विकारणार असल्याची िश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
त्या महिला खासदारांनी त्यांना सर्वतोपरी साम-दाम-दंड-भेद मदत करण्याचे आश्वासन याआधी देखील दिले होते परंतु त्यावेळी या नेत्याने ती ऑफर स्वीकारली नाही व आपल्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार एका राज्यमंत्र्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला.
जोमाने कामाला लागला अर्थात तरुणांमध्ये लोकप्रिय व तडकाफडकी निर्णय घेणे या शैलीमुळे कामाचा ओघ वाढला व जनतेचे समर्थन आधीपेक्षा दुप्पट तिप्पटीने या नेत्याकडे वाढलेले आहे. परंतु, कुरघोडीच्या राजकारणामुळे कुठेतरी पुन्हा परत जुना अनुभव आपल्या पाठीशी येताना पाहून नेमकी समाजसेवा तथा जनसेवे तून परत दुर्लक्ष आहे होत असल्याचे पाहून हा नेता आता नवीन निर्णय घेणार की काय अशी गुप्त चर्चा त्याच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.
भाऊ कुठे गेले तरी शेवटी कामगारांना शेतकऱ्यांना बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याकरिता जातील अथवा जाणार आहेत अशी चर्चा त्यांच्यामध्ये रंगली आहे
या निर्णयामागे मोठे कारण असेही सांगण्यात येत आहे की आपल्या भागातील कोळसा खाणी व सिमेंट उद्योग हे केंद्र शासनाने अंतर्गत येत आहेत त्यामुळे याठिकाणी उद्भवत असलेल्या सर्व समस्यांना राज्य शासन मिटविण्यात अथवा दूर करण्यास असमर्थ आहे.
त्या युवा नेत्याची विशेषता म्हणजे दिलेला शब्द कसाही करून पूर्ण करणे मग त्यासाठी कुठल्याही थराला का जावे लागत नसेल. अशा स्वभावामुळे हा नेता आता परत एकदा आपला गॉडफादर बनविण्याच्या तयारीत आहे, असे दिसत आहे.
आता समोर वेळ सांगेल की ह्या चर्चा व या बातम्या खऱ्या उतरतात की खोट्या निघतात. परंतु जर असे घडले तर जिल्ह्यामध्ये कुठेही नाव नसलेला पक्ष जो मोठ्या जोमाने आज सर्वत्र चर्चेत आला तो परत अंधारात जाणार हे निश्चित.
टीप :- सदर बातमी ही फक्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बनविलेली आहे कुठल्याही पक्षाचे अथवा व्यक्तीचे नाव यामध्ये नोंदविलेले नाही कोणीही स्वतःला ही बातमी लावून घेऊ नये.