प्रहार -सामान्य जनतेच्या सामान्य प्रश्नांवर.. ! : कु. रोहिणी झाडे रा. दुर्गापुर या होतकरू गरीब विद्यार्थिनी ची पॉलिटेक्निक ची फी माफ : पांडुरंग आंबटकर(सोमैया पॉलिटेक्निक चे अध्यक्ष तथा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर )यांनी दिली प्रहार प्रतिनिधींच्या विनंतीला साद #prahar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रहार -सामान्य जनतेच्या सामान्य प्रश्नांवर.. ! : कु. रोहिणी झाडे रा. दुर्गापुर या होतकरू गरीब विद्यार्थिनी ची पॉलिटेक्निक ची फी माफ : पांडुरंग आंबटकर(सोमैया पॉलिटेक्निक चे अध्यक्ष तथा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर )यांनी दिली प्रहार प्रतिनिधींच्या विनंतीला साद #prahar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यात राज्यमंत्री बच्चू कडू प्रणित प्रहार प्रतिनिधिनी सामान्य जनतेच्या सामान्य प्रश्नांना वाचा फोडत उल्लेखनीय कार्याचा सपाटा लावला आहे. 
अश्याच एका प्रकरणात काल दि:- ०३/०९/२०२० ला प्रहार जनशक्ती पक्ष शहर चंद्रपूर तर्फे मा. श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कु. रोहिणी झाडे रा. दुर्गापुर ही मुलगी शिक्षणात अत्यंत हुशार असून संस्थेत नियमित आहे व प्रथम वर्षात ९० % घेऊन उत्तीर्ण झाली आहे. 
प्रथम वर्षी तडजोड करून तिने ३२,०००/- वर्षाची फी भरली होती पण द्वितीय वर्षात आर्थिक परिस्थिती नसल्याने ती फी भरू शकत नव्हती. 
ही बाब प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय, चंद्रपूर येथे माहीत होताच, विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता तात्काळ विद्यार्थिनीची द्वितीय वर्षाची फी माफ करण्याकरिता पांडुरंग आंबटकर(सोमैया पॉलिटेक्निक चे अध्यक्ष तथा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर) यांच्याकडे निवेदन दिले असता दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत सदर विद्यार्थिनीची सलग दोन वर्षाची फी माफ करून दिली. 
यावेळेस निवेदन देताना प्रहार सेवक राहुल चव्हाण, दयानंद नागरकर, चिन्ना जनेकर, सोनू चव्हाण, रितिक बिसेन आदी प्रहार सेवक उपस्थित होते.