गोंडपिपरी तालुक्यातील मिनीआयटीआय मध्ये शिवणकलेचे प्रमाणपत्र आणण्याकरिता गेलेल्या एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रूपये देतो आपण संबध प्रस्तापित करू अशी मागणी केली.तिचा विनयंभंग केला असल्याची तक्रार आरोपी संचालकाविरोधात विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या सविस्तर तक्रार बयान नुसार गोंडपिपरी येथे एक खाजगी मिनी आयटीआय आहे.कोेंढाणा येथील अमीत अलोणे हा युवक मिनीआयटीआय चालवितो.यामाध्यमातून शिवणक्लास व इतर बाबींचे प्रशिक्षण दिल्या जाते.
गोंडपिपरी लगत करंजी येथील दोन तरूणींनी या मिनीआयटीयात शिवणक्लाससाठी प्रवेश घेतला.परिक्षाही झाली.त्यानंतर काल 6 सप्टेंबर ला त्या डिप्लोमा घेण्याकरिता आयटीआय मध्ये गेल्या.
दरम्यान संचालक अमीत अलोणे याने एका तरूणीला दुस-या खोलीत मासिक पाळीबाबत सविस्तर लिहीण्यासाठी सांगितले.दुसरीच्या सोबत तो अलंगट करू लागला.त्याने तिला अश्लील चित्रही दाखविले.यांनतर तिचा विनयभंग केला.तुझ्यासोबत मी लग्न करतो.तुझ्या सोबत मला संबंध ठेवायचे असे म्हटले.सोबत यासाठी दहा हजार रूपये तिच्या बॅकेच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले.
यावरच तो थांबला नाही तर अॅडव्हान्स म्हणून त्याने पाचशेच्या दोन नोटा तिच्या हातात दिल्या.पण तरूणीने नकार दिला.अन दुस-या खोलीत असलेल्या मैत्रीणीने तिला आवाज मारताच हिच संधी साधून तिने आपली सुटका केली.यानंतर दोघेही घाबरलेल्या अवस्थेत आपल्या गावाला पोहचल्या.
घरी गेल्यानंतर तरूणीने घडलेला प्रसंग आईवडिलांना सांगितला.यानंतर त्यांनी थेट गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठल.पोलीसात घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली.तरूणी हि अल्पवयीन असल्याने विनयभंग करणा-या अमीत अलोणेविरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला अटक करण्यात आली आहे.प्रकरणाचा पुढील तपास गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले हे करित आहेत.