ओबीसी संवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करू नये. - राष्ट्रीय ओबीसी कर्माचारी ,अधिकारी महासंघाची मागणी #obc. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओबीसी संवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करू नये. - राष्ट्रीय ओबीसी कर्माचारी ,अधिकारी महासंघाची मागणी #obc.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 28 सप्टेंबर 



नुकतीच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून अनेक मराठा संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नये यांकरीता राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी ,अधिकारी महासंघ राजुरा च्या वतीने तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार ,इतर मागास बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठविण्यात आले.




महाराष्ट्रातील ओबीसी जागेचा ब्यक्लॉक अजुनपर्यंत महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेला नाही. तसेच 18 जून 1994 च्या परीपत्रकानुसार ओबीसीचे 19% असलेले आरक्षण महाराष्ट्रातिल अनेक जिल्ह्यांना मिळालेले नाहीत. 




वेगवेगळ्या जिल्ह्यातिल आरक्षणातिल विसंगती दिसून येत आहे.ही विसंगती त्वरित दूर करण्यात यावी , सर्वांची जातीनीहाय जनगणना करावी आणि मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये अश्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 




यावेळी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी ,अधिकारी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुभाष अडवे , उपाध्यक्ष मधुकर मटाले , वसंत डाहुले ,महासचिव किसन बावणे ,कोषध्यक्ष एस.डी.परसुटकर ,सहसचीव रामरतन चापले आदिँचि निवेदन देतेवेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.