चंद्रपुरात लॉकडाऊन नाही #No lockdown at chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात लॉकडाऊन नाही #No lockdown at chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर – 


3 सप्टेंबर पासून होणाऱ्या लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे, शासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे हा लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.


29 ऑगस्टला चंद्रपुरात 3 सप्टेंबर पासून लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत होणारी वाढ बघता हा निर्णय करण्यात आला होता.


परंतु केंद्र व राज्य शासनाच्या नवीन गाईडलाईन्स मुळे लॉकडाऊन संदर्भातील निर्णयासंबंधी केंद्राकडून परवानगी आवश्यक असल्याने आम्ही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला परंतु अजूनही त्या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने हा लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी टीम खबरकट्टा सोबत बोलताना दिली.