राज्यात सत्तापरिवर्तन होताच ग्रामीण स्तरावर ही अनेक राजकीय उला पथि बघायला मिळते आहे. कोरपना तालुक्यातील भाजप निलंबित, जनसत्याग्रह संघटनेचे चे संस्थापक अध्यक्ष आणि आदिवासी नेत्यांचा गृहमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत रा. कां. मध्ये काल नागपूर येथे छोटेखानी कार्यक्रमात प्रवेश झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोरपना तालुक्यातील सत्याग्रह समितीचे कोरपना तालुका अध्यक्ष सय्यद आबीद अली यांच्यासह विनोद जुमडे आणि आदिवासी नेते सुदर्शन आळे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी झालेल्या छोटेखानी पक्ष प्रवेश कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोरेश्वर टेम्भूर्डे , राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा बेबीताई उईके, राजुरा विधानसभा प्रमुख अरूण निमजे, गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी उपस्थितीत होते.