जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन #ncp-agitation-front-collectors-office - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन #ncp-agitation-front-collectors-office

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

कांद्याची निर्यात बंदी केल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी रकरण्यात आली.महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेत आहेत. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. मात्र भाजप सरकारने बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे काद्यांची निर्यात सुरु करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे, ओबीसी अध्यक्ष शुभांगी डोंगरवार, जिल्हा संघटिका ज्योती कवठेकर जिल्हा सचिव शोभा घरडे, राणी रॉय, रंजना नागतोडे, निलिमा नरवडे, माधुरी पांडे, सुमित्रा वैद्य, नंदा सोनुले, श्वेता रामटेके आदी उपस्थित होते.