मर्डर : प्रफुल गारूडे चा शुल्लक कारणावरून खून : खुनातील आरोपीस तात्काळ अटक #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मर्डर : प्रफुल गारूडे चा शुल्लक कारणावरून खून : खुनातील आरोपीस तात्काळ अटक #murder

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी -सुरज चाटे 


शहरातील रेड एरिया म्हणुन प्रसिद्ध असलेल्या दिपक चौपाटी परिसरात खुन, मारामारी, लुटमार अशा घटना आधी नेहमीच घडत असे, परिणामी या भागात पोलीस चौकी लावण्यात आली होती. तेव्हापासुन या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते.


दरम्यान बुधवारी सायंकाळी या परिसरात दोन तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती.


सदर गुन्हृयात आरोपी अमोल शंकर काकडे (30) रा. शास्त्रीनगर, वणी  विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली.

प्रफुल बंडु गारुडे (३०)रा.रामपुरा असे म्रुतकाचे नाव आहे.प्रफुल हा दिपक चौपाटी परिसरातील करन बार समोर अमोल काकडे यांचे कडे अंडे घेण्यासाठी गेला असता अमोल काकडे याने तु माझे गाड्यावर विनाकारण गर्दि करु नको, तुला अंडे देत नाही तु इथुन निघुन जा, असे म्हणुन वाद घातल्याने तिथुन निघून जात असताना भगवान सां मिल समोर मोकळ्या जागेत आरोपी अमोल ने बुधवारी दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६:३० वाजता चे दरम्यान प्रफुल गारोडेला मागुन येऊन डोक्यावर, तोंडावर, पोटावर,पायावर काठिने जबर मारहाण केल्याने प्रफुल ला चक्कर आल्याने त्याच्या मित्रांनी त्याला घरी आणुन दिले.
दुसर्या दिवशी दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता जखमी प्रफुलची पत्नी प्रफुल ला दवाखान्यात घेऊन जाने करिता उठविण्यास गेली असता प्रफुल ने कोणतीही हालचाल केली नाही.त्यामुळे पती प्रफुल मरण पावल्याचे समजले.अशी प्रफुल ची पत्नी फिर्यादी सौ.वेनु प्रफुल गारोडे हिच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी अमोल शंकर काकडे विरुद्ध वणी पोलिसांनी कलम ३०२ भादंवी अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हा घडल्याची खबर मिळताच ठाणेदार वैभव जाधव यांनी डि.बी.पथकास आरोपीस तात्काळ अटक करणे बाबत मार्गदर्शन करुन आरोपीचे शोध घणे कामी पथक रवाना केले असता डि.बी.पथकाने आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सदरची कारवाई सुशिल कुमार नायक उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सपोनी/निखिल फटिंग,माया चाटसे, पोउनि/प्रताप बाजड,डि.बी.पथकाचे पोउनि/ गोपाल जाधव,पोना/सुनील खंडागळे, सुधिर पांडे,रत्नपाल मोहाडे,अमित पोयाम, सचिन गाडगे, अविनाश बनकर, अमोल नुनेलवार यांनी केली.