ब्रेकिंग खून : बाबू उर्फ अजय यादव वर चाकू व तलवारीने वार : आज सकाळी उपचारार्थ मृत्यू :माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट व त्याचा भाऊ राजू केवट मुख्य आरोपी : जागेच्या अतिक्रमणावरून वाद #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग खून : बाबू उर्फ अजय यादव वर चाकू व तलवारीने वार : आज सकाळी उपचारार्थ मृत्यू :माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट व त्याचा भाऊ राजू केवट मुख्य आरोपी : जागेच्या अतिक्रमणावरून वाद #murder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :माजरी -


माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट व त्याचा भाऊ राजू केवट यांनी आपल्या नातेवाईकांना घेऊन बाबू उर्फ ​​अजय यादव नामक एका युवका दिनांक 15 सप्टेंबर ला वर तेज चाकू आणि तलवारीने हल्ला करून वेकोली रुग्णालय जवळील नालीत नाल्यात फेकले व ते फरार झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
या घटनेतील गंभीर अवस्थेत असलेल्या अजय यादव याला चंद्रपूर जिल्हा सामन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्याची गंभीर प्रक्रुती बघता त्याला गंभीर अवस्थेत सेवाग्राम येथे नेण्यात आले परंतु आज 17 सप्टेंबर ला सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. हल्ला करणाऱ्या आरोपी पैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून तीन आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले आहे.


बाबू उर्फ ​​अजय यादव व त्यांच्या बेरोजगार मित्रांनी माजरी च्या LCH क्वार्टर जवळील जमीनवर अतिक्रमण करून दुकान बांधकाम सुरू केले होते, पण
अमित केवट ने LCH क्वार्टर जवळील जमीनवर माझा कब्जा आहे असे म्हटल्याने अमित केवट और बाबू उर्फ ​​अजय यादव हे दोघेही माजरी पोलिस स्टेशन गेले होते.


मात्र पोलिस स्टेशन मधे दोघानांही समजवून घरी पाठवले होते दरम्यान वेकोलि माजरीचे सुरक्षा अधिकारी यांनी माजरी पोलिस स्टेशन मधे तक्रार करून वेकोलिच्या जमीनवर जे बांधकाम सुरू आहे ते बंद करण्यात यावे. 


त्यामुळे पोलिस विभागाने सर्व बांधकाम करणाऱ्यांना नोटीस दिले होते.पण तरीही ग्रामपंचायत सदस्य अमित केवट व त्याचा भाऊ राजू केवट यांनी आपल्या नातेवाईकांना घेऊन बाबू उर्फ ​​अजय यादव यांच्यावर प्राणघातक हमला केला त्यात आज सकाळी अजय यादव यांचा मृत्यू झाला.