ब्रेकिंग मर्डर चंद्रपूर : दिवसाढवळ्या घरात घुसून धारदार शस्त्राने खून : दोन आरोपी अटकेत : आज दुपारची घटना #murder-at-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग मर्डर चंद्रपूर : दिवसाढवळ्या घरात घुसून धारदार शस्त्राने खून : दोन आरोपी अटकेत : आज दुपारची घटना #murder-at-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
कोरोनाच्या दहशतीसोबतच चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचि दहशत सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. लहान सहान कारणांवरून खुलेआम हल्ले, गोळीबार, खून याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आज चंद्रपूर शहरात अश्याच शुल्लक कारनावरून खून केल्याची घटना घडली आहे. चंद्रपूर शहरातील रयतवारी परिसरातील बीएमटी चौकातील पंखा परिसरात एका युवकाचा जुन्या शुल्लक वादातून खून झाल्याची घटना दुपारी 1:30 च्या सुमारास घडली.प्राथमिक माहिती नुसार घटनेतील मृतक युवकाचे नाव करन केवट (वय 25 वर्ष )आहे, हा युवक दुपारच्या सुमारास अचानक घरात घुसून त्याचाच मित्र मोहम्मद सरफराज शेख व त्याच्या साथीदाराने धारदार शास्त्राने वार करत करन चा खून केला.धारदार शास्त्राने करणच्या शरीरावर अनेक घाव केल्यामुळे व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचविले असता अधिक रक्तस्त्रावामुळे त्याचा वाटेतच मृत्यू झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. सदर घटना घडताच परिसरात प्रचंड तणावाची स्तिथी होती त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करा म्हणतं रामनगर पोलीस ठाण्यात घेराव करताच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.