मर्डर चंद्रपूर : मनोज अधिकारी यांचा निर्घृण खून : चंद्रपूर ची खुनपूर कडे वाटचाल #murde-at-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मर्डर चंद्रपूर : मनोज अधिकारी यांचा निर्घृण खून : चंद्रपूर ची खुनपूर कडे वाटचाल #murde-at-chandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -


चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस अवैध धंदे व त्यातून कुख्यात गुन्हेगारी प्रचंड प्रमानात फोफावत आहे. या गुन्हेगारीतून अनेक हल्ले, हत्या,गोळीबार, मारझोडीचे प्रकरणे जिल्हाभर घडत आहेत. या प्रकारच्या घटना जिल्ह्यात आता सामान्य बनत असून दर दोन तीन दिवस आड हत्यांची प्रकरण समोर येत आहेत. 




आज दिनांक 30सप्टेंबर रोजी चंद्रपुरातील मनोज अधिकारी (38), व्यवसायीक बंगाली कॅम्प चंद्रपूर यांची पडोली येथील  सिनर्जी वर्ल्ड या वसाहत परिसरात कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती येत आहे. 




सदर घटना आज दुपारी 1: 30 ते 2 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मनोज अधिकारी हे कालपासूनच बंगाली कॅम्प येथील आपल्या राहत्या घरी परतले नव्हते. सदर घटना प्रेमप्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक चर्चा असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे असल्याचे थोडक्यात वृत्त आहे. 




मनोज अधिकारी हे काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ता असून बंगाली कॅम्प परिसरात सेवाभावी व्यक्ती म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यामुळे या घटनेचे वृत्त कळतच त्यांच्या वास्तव्य परिसरात तणावाची स्तिथी आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....