MQL फौंडेशन कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात ##MQL FOUNDATION - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

MQL फौंडेशन कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात ##MQL FOUNDATION

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -


महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचे सदस्य असलेल्या MQL FOUNDATION तर्फे वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची किटचे वितरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रम्हपुरी तालुक्यात पूरग्रस्त कीन्हीं, हरदोली व चिखलगाव येथील अत्यंत गरजवंत कुटुंबाना अन्नधान्याच्या पस्तीस किटचे वाटप करण्यात आले. किटमध्ये जीवनावश्यक तेल, साखर, पत्ती, तांदूळ, डाळ,साबण, निरमा, तिखट, मीठ, हळद, बेसन,मसाला,कांदा, लसूण, बटाटे इत्यादी देऊन कुटूंबाना मदत करण्यात आली.यावेळी MQL FOUNDATION चे सदस्य श्री बालाजी ठाकरे सर व श्री आतिष धोटे सर ,कीन्ही चे सरपंच अभयजी कूथे, हरदोली चे सरपंच सौ भूमिका गौतम मेश्राम, चिखलगावचे सरपंच सौ पुष्पा पुरुषोत्तम धांडे , कल्पना अभ्यासिका मधील अभ्यास करणारे विद्यार्थी उल्हास राऊत, योगेश निकुरे, रंजित मरस्कोले, दीपक बागडे हे उपस्थित होते . किट वाटप करतांना श्री गिरीधर पात्रे हरदोली आणि मुकेश ढोरे चिखलगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.


MQL FOUNDATION च्या तात्काळ मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.


अशा या कठीण प्रसंगी विविध संघटनांनी मदतीचा हात पुढे करून पूरग्रस्त कुटुंबाना मदत करावी आणि त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन MQL फौंडेशनच्या वतीने सदस्य श्री अतिष धोटे यांनी केले.