माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला : नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन #maze kutumb mazhi jababdari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला : नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन #maze kutumb mazhi jababdari

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि. 18 सप्टेंबर: 



माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य पथकाद्वारे तपासणी केली जाईल. 



या मोहिमेस सर्व नागरीकांनी सहकार्य करावे आणि मोहिमे दरम्यान तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य पथकांकडून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागा मार्फत केले आहे.



शासनाने राज्यभर माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील शहर, गावे, वस्त्या यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी आणि प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहे. 



हि मोहिम दिनांक 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पहिली फेरी दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर या कालावधीत होईल आणि दुसरी फेरी दिनांक 11 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत होईल आणि मोहिमेची सांगता दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी होईल.