मुख्यमंत्र्यानंतर आता शरद पवार व अनिल देशमुख यांनाही धमक्यांचे फोन : तपास सुरु #maharashtra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुख्यमंत्र्यानंतर आता शरद पवार व अनिल देशमुख यांनाही धमक्यांचे फोन : तपास सुरु #maharashtra

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवार यांनादेखील धमकीचा फोन आला आहे. हा धमकीचा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती मिळत आहे.सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा फोन आला होता. मातोश्रीप्रमाणे वर्षावरही धमकीचा फोन आला होता. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणात धमकीचे फोन येत आहेत. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका देशमुख यांनी कंगनावर केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याचं कळतं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं 'मातोश्री' निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हा फोन दुबईहून आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दाऊदचे हस्तक असल्याचं म्हटलं होतं. हा फोन नेमका कोणी केला होता, याचा तपास सध्या सुरू आहे. 

पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीनं दाऊद इब्राहिमच्या नावानं धमकी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? मातोश्रीच्या लँडलाईनवर दुबईहून फोन कॉल कुणी केला?, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.