नेरी बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सर्वत्र शुकशुकाट #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नेरी बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सर्वत्र शुकशुकाट #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -नेरी 


चिमुर तालुक्यातील नेरी येथे जनता कर्फ्युला  जनता उत्स्फूर्तपणे साथ देत असल्याने जनतेनी जनतेच्या हितासाठी संचार बंदी लादल्याने हा जनता कर्फ्यु यशस्वी होतांना दिसून येत आहे.


नेरी येथे नुकतीच तालुका प्रशासकीय अधिकारी यांंची कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत सभागृहात सभा आयोजीत केली होती.


बैठकीला तालुकाचे प्रमुख अधिकारी वर्गांची उपस्थित होती तसेच व्यापारी प्रतिष्ठान चे अध्यक्ष ,प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार,राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


सभेला उपस्थित अधिकारी यांनी आणी मान्यवरांनी कोरोणा या भयावह आजाराविषयी माहिती दिली मार्गदर्शन केले स्वतः ची काळजी स्वतः घेऊया आणी जनतेच्या सहकार्याने कोरोणाची ऋंखला तोडता येऊ शकते यासाठी नेरी येथे तिन दिवसाचा लाँक डाऊन पाळण्यासाठी सर्वांनी सम्मती दर्शवली.


आणि दि.१६ सप्टेंबर पासून मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने,चाय टपऱ्या, भाजीपाला,हाँटेल,ईतरही लहान सहान दुकाने कळकळीत बंद ठेवून जनतेनी सुध्दा कामाशिवाय घराबाहेर जायचे नाही असा संकल्प केल्याने नेरीची जनता संचारबंदी यशस्वी होतांना दिसून येत आहे गावात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.


जनता कर्फ्यु चा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी ही जनतेने जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोरोणाची साखळी तोडण्यासाठी स्वयंस्फूर्तीने या लाक डाऊन मध्ये सहभाग दर्शवावा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासन आणी ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.