ब्रह्मपुरीत कोरोनाचे वाढते रूग्ण ; लॉकडाऊन ची मागणी #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रह्मपुरीत कोरोनाचे वाढते रूग्ण ; लॉकडाऊन ची मागणी #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:- 


शहरात तसेच तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेनदिवस वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ठरले आहे शहरातील कोणत्याही भाग आजच्या घडीला सुरक्षित नाही. शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत आहे. 


शहरात व तालुक्यात काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आजच्या घडीला ११५ ग्रामीण भागात १४१ असे एकूण २९६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहे. तर ०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. 


ही वाढती कोरोनाची साकळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन गरज असल्याचे बोलल्या जात आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोनाचा पार्दुभाव वाढतच असुन कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याशी व कर्मचाऱ्यांना नागरिक सहकार्य करताना दिसत नाही. तरी सुद्धा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 


लक्षणे असतानासुद्धा नागरिक तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करत असतात. ही बाब आरोग्यासाठी योग्य नाही. तपासणी ला उशीर केल्यास आजार बळावतो.व ५० वर्षीय व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतो. तपासणीला उशीर झाल्यास क्यू होण्याची दाट शक्यता असते. तसे आरोग्य विभागाचे निरीक्षण असून पहिल्या टप्प्यात कोरोनाची निरीक्षण केल्यास कोरोनाचा धोका वाढत नाही.


🔰अँटीजेन तपासणी ला घाबरून जाऊ नका

लक्षणे आढळतात तपासणी करून घ्यावी . पण बरेच व्यक्ती शेवटच्या टप्प्यात तपासणीसाठी पुढे येत असतात. त्यामुळे कोरोनाचा पार्दुभाव फुफ्फुसा पर्यंत पोहचतो. व परिणामी मृत्यू ओढावतो. तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.ताफ,खोकला, सर्दी,घसा खवखवने,तोडाची चव जाणे,अशी लक्षणे दिसताच त्वरीत तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.🔰 लक्षणे दिसताच त्वरीत तपासणी करा

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संदर्भात अधिक काळजी घेण्यात आवश्यकता आहे.तपासणीला आधिक उशीर केल्यास धोकाही अधिक संभावतो.उशीरा तपासणी मुळे कोरोना विषाणूचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये जाऊन त्याचा फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. कोरोनाचे लक्षणे आढळतात त्वरीत तपासणी करा.व स्वताला धोक्यापासून दुर ठेवा असे आवाहन उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी क्रांती डोंबे यांनी केले.