चंद्रपूर जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे.
अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची बाजारात वाढणारी गर्दी, संसर्गातून कोरोनाची वाढलेली संख्या व इतर सर्व बाबींचा विचार केल्यास आता खरे लॉकडाऊन हवे अश्या प्रतिक्रियाही नागरिक व्यक्त करीत आहेत.
याबाबत पालकमंत्र्यांची १८ सप्टेंबरला येथील व्यापारी संघासोबत होणारी बैठक २१ सप्टेंबरला होणार असून त्याबाबत खालील निमंत्रने पाठविण्यात आली आहेत.
1. अध्यक्ष, Chandrapur Chamber of Commerce.
2. जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर
3. जिल्हा अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, चंद्रपूर
4. जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चंद्रपूर
5. जिल्हा अध्यक्ष, शिवसेना, चंद्रपूर
6. जिल्हा अध्यक्ष, बहुजन समाज पार्टी, चंद्रपूर
7. जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूर
सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले असून जनता कर्फ्यू निर्णयांत पुन्हा स्वैच्छिक बंद पुकारावा लागेल हे लवकरच स्पष्ट होईल.