आठवड्याभरात दारूबंदी हटविण्यावर निर्णय : वडेट्टीवारांची धडपड निर्णायक होईल काय? कॅबिनेट मधील अनेक मंत्री अनुकूल..!! ओपन बिअर सेल (खुली व्रिक्री ) व नवीन परवानने विचाराधीन #liquer ban to release for chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आठवड्याभरात दारूबंदी हटविण्यावर निर्णय : वडेट्टीवारांची धडपड निर्णायक होईल काय? कॅबिनेट मधील अनेक मंत्री अनुकूल..!! ओपन बिअर सेल (खुली व्रिक्री ) व नवीन परवानने विचाराधीन #liquer ban to release for chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटावी यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह याबाबत चर्चा झाली आहे.


विदर्भातील काही भागात पूर परिस्थिती बघता आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करीत आहे, त्यामुळे 2 सप्टेंबरला मुंबई मध्ये उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक रद्द करण्यात आली होती.


आजपासून 7 व 8 सप्टेंबर राज्याचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे , या अधिवेशनानंतर कॅबिनेट समोर दारूबंदी हटविण्याबाबत प्रस्ताव ठेवल्या जाणार आहे , चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटावी याबाबत अनेक मंत्र्यांनी अनुकूलता दाखविली आहे अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली आहे .


चंद्रपूर सोबतच वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यास महाविकास आघाडी सरकार इच्छुक असल्याचे कळते. त्यासोबतच राज्यात बिअर ओपन सेल - खुली विक्री करण्याची मुभा देण्याच्या व तिन्ही जिल्ह्यात नव्याने परवाने दिले जाईल असे विचाराधीन असल्याचे कळते.