वणीतील वकील सुरज महारतळे कृषीरत्न पुरस्काराने सन्माणित. नवयुवकांना संजीवनी :- वकिलीसह सांभाळली शेतीची धुरा #krushiratna - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वणीतील वकील सुरज महारतळे कृषीरत्न पुरस्काराने सन्माणित. नवयुवकांना संजीवनी :- वकिलीसह सांभाळली शेतीची धुरा #krushiratna

Share This
खबरकट्टा / यवतमाळ / वणी :- सुरज चाटे


राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन 2020, ऑनलाईन पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा झूम अँपवर शानदार संपन्न झाला. 


महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कार प्रधान करण्यात आले. या सोहळ्यात ऍडव्होकेट सुरज वामन महारतळे यांच्या कृषी विभागातील कामगिरी बघता त्यांना महाराष्ट्र कृषीरत्न पुरस्काराणे सन्मानीत कण्यात आले यावेळी फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला.वकिली व्यवसाय करीत शेतीची धुरा सांभाळणारे युवा नेतृत्व सुरज महारतळे हे जणू नवयुवकांसाठी संजीवनी देण्याचे कार्य जणू यामाध्यमातून दिसत आहे यामुळे नवयुवकांना आपले स्वप्न व जोडधंदा शेती पूर्ण कसे करता येईल याचे उत्कृष्ट उदाहरण यातून मिळते.


या सोहळ्यातच सर्व मानकऱ्यांना इ-मानपत्रे त्यांच्या व्हाट्सअपवर देण्यात आली. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प श्री. केशव जी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी पुरस्काराच्या प्रेरणेतून आपले भारत राष्ट्र अधिक शक्तिशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन केले. 


दुर्जन शक्तीच्या वाढत्या प्रादुर्भावाला जर पराभूत करायचे असेल तर तुमच्यासारख्या गुणवंतांच्या सज्जन शक्तीचे संघटन देशात निर्माण व्हायला हवे; असेही प्रतिपादन त्यांनी केले. सुप्रसिद्ध तत्वचिंतक ह भ प श्री श्यामसुंदर महाराज सोन्नर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. अशोकानंद जी जवळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक श्री. रमेश आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार श्री. सदानंद खोपकर, सुप्रसिद्ध आदर्श शिक्षिका श्रीमती मनिषा कदम घार्गे मॅडम आणि सौ. विनया जाधव मॅडम, प्राचार्या श्रीमती रोशनी शिंदे मॅडम, प्राचार्या श्रीमती कल्पिता पर्शराम, प्राचार्या श्रीमती प्रगती साळवेकर, सामाजिक नेत्या डॉ. शुभदा जोशी तसेच धडाडीच्या डॅशिंग आयकर अधिकारी श्रीमती अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली.


व्हिडिओद्वारे आपले शुभ संदेश दिले. व्यासपीठावर शिवयोगी तर आणि प्रगतिशील शेतकरी उद्योजक श्री. पांडुरंग दादा मातेरे उपस्थित होते. या राज्यस्तरीय ऑनलाईन समारंभाचे अतिशय उत्तम व्यवस्थापन श्री. राजेंद्रदादा सरोदे यांनी पाहिले. या ऑनलाईन समारंभाचे सूत्रसंचालन गुणिजन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी केले. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात ऑनलाईन मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. 


ये देश हैं वीर जवानो का या गाण्यावर उपस्थित सर्वांनी धरलेला नृत्याचा ठेका सर्वांची टाळी मिळवून गेला. सर्व स्थरा वरून सुरज महारतळे यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.