नांदा येथील ' त्या ' वादग्रस्त जागेवरील बांधकाम थांबवा : दिवाणी न्यायालयाचे पोलिसांना निर्देश : बांधकाम करणाऱ्या सिद्दीकी ला न्यायालयाचा दणका : सिद्दीकी यांच्या बेकायदेशीर बांधकामाला प्रियाताईचा पाठिंबा आहे का..??? #korpana - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नांदा येथील ' त्या ' वादग्रस्त जागेवरील बांधकाम थांबवा : दिवाणी न्यायालयाचे पोलिसांना निर्देश : बांधकाम करणाऱ्या सिद्दीकी ला न्यायालयाचा दणका : सिद्दीकी यांच्या बेकायदेशीर बांधकामाला प्रियाताईचा पाठिंबा आहे का..??? #korpana

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -नांदा फाटासध्या नांदा गाव हे वेगवेगळ्या बेकायदेशीर बांधकामाने चर्चेत येत आहे. आता तर सरास सरकारी जागेवर हारून सिद्दीकी व त्याच कुटुंबातील इतर दोन सदस्य यांनी बांधकाम सुरू केले होते. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हणत मनसेचे प्रकाश बोरकर यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली. 
चंद्रपूर दिवाणी न्यायालयाने वादातील मालमत्तेत सुरू असलेले बांधकाम थांबवावे असे आदेश २४ सप्टेंबरला दिले होते. मात्र या आदेशाचे पालन होत नसल्याची बाब आज तातडीने त्यांनी चंद्रपूर दिवाणी न्यायालयाला लक्षात आणून दिली. याबाबत न्यायालयाने अती तातडीने दखल घेत नांदा येथील सिद्दीकी यांचे वादातील वादग्रस्त बांधकाम थांबविण्याचे निर्देश गडचांदुर पोलिसांना दिले.
विशेष म्हणजे सदर बांधकामासाठी ग्रामपंचायतीचे ' ना हरकत प्रमाणपत्र ' व नगररचना विभागाची परवानगी देखील घेतली नाही. नांदा येथे मागे एका बांधकामाविरोधात ज्या लोकांनी उपोषण केले त्या लोकांशी संबधित हा व्यक्ती असल्याने 'उलटा चोर कोतवाल को डाटे' अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे. हारून सिद्दीकी हा काँग्रेस पक्षाशी संबंधित असून बेकायदेशीर कामासाठी नेमके कोणाचे ' अभय ' यांना मिळत आहे..? असा उपरोधिक सवाल बोरकर यांनी विचारला. 
नांदा ग्रामपंचायत हद्दीतील ५ ते ६ गुंठे जागेवर सदर व्यक्तीने अतिक्रमण केले असून याविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी मनसेचे प्रकाश बोरकर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणेदार पो.स्टे. गडचांदूर यांचेकडे लेखी तक्रारीतून दिली होती. 
मात्र २ महिन्यापासून त्या वादग्रस्त जागेवर पिलर पर्यंतचे पक्के बांधकाम सुरू झाले होते. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे हारून सिद्दिकी कुटुंबिय बॅकफुटवर आले आहे.
आता न्यायालयीन लढाई सुरू झाली असून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सिद्दीकी यांना आता न्यायालयाच्या आदेशामुळे पुढील सूनवाई पर्यंत बांधकाम थांबवावे लागणार आहे.
या आधी नांदा गावातील एका बांधकामाविरोधात तेथील काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्या प्रियाताई राजगडकर यांनी सदर बेकायदेशीर बांधकामा असल्याचे म्हणत उपोषण केले होते. आता मात्र सिद्दीकी यांचे बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचे समोर येत असताना प्रियाताई काहीही बोलताना दिसत नाही. सिद्दीकी यांच्या बेकायदेशीर बांधकामाला त्यांचा पाठिंबा आहे का..? आणि प्रियाताई गेल्या कुठे...? अशी चर्चा नागरिकांत सुरू असल्याचे बोरकर यांनी सांगितले.