चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. यात ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते. मात्र आता त्यांची प्रकृती बरी असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीवरून टीम खबरकट्टा सांगितले. चार-पाच दिवसात कोरोनातून बरे होऊच चंद्रपूरला परत येईन, असेही ते म्हणाले. वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे पालन करावे असेही त्यांनी आवाहन केले.
मात्र उद्यापासून होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत.