जनता कर्फ्यू लावण्यासंदर्भात उद्या निर्णय : प्रशासनाकडून हालचाली व बैठक : लोकप्रतिनिधी, संघटनांना सोमवारी चर्चेसाठी बोलावण्यात आले #janta curfew at chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जनता कर्फ्यू लावण्यासंदर्भात उद्या निर्णय : प्रशासनाकडून हालचाली व बैठक : लोकप्रतिनिधी, संघटनांना सोमवारी चर्चेसाठी बोलावण्यात आले #janta curfew at chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने आता स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली संघटनांना सोमवारी चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीनंतरच संभाव्य जनता कफ्फ्यूची तारीख निश्चित केली जाणार आहे.पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी कोरोना संबंधी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरोग्य यंत्रणेवर वाढले ताण आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता सध्या कडक लॉकडाउनची अत्यंत आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, काही लोकप्रतिनिधींचा विरोध आणि तांत्रिक अडचणींमुळे लॉकडाउन करणे शक्य नाही. त्यामुळे आता जनता कर्फ्यू करण्याचा विचार पुढे आला आहे. सर्व लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यू लावण्यात यावा, अशी सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली जाणार आहे. सर्वांची मते जाणून घेवून जनता कार्यासाठी तारीख निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्पष्ट केले आहे.