चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना जाहिर सुचना : अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर #janta-carfew-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना जाहिर सुचना : अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर #janta-carfew-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्हयांतर्गत सर्व व्यापारी संघ, स्थानिक नागरीक व लोकप्रतिनीधी यांच्या सुचना व सहमतीने चंद्रपूर जिल्हयांतर्गत दैनंदिन वाढत असलेले कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर प्रतिबंध करणे व कोरोना रोगाची साखळी खंडीत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी कमी करणे याकरीता दिनांक 25 सप्टेंबर, 2020 पासुन ते दिनांक 01 ऑक्टोबर, 2020 पर्यत स्वयंस्फुरतने जनता कर्फ्यू पाळण्याचे दिनांक 21.09.2020 ला झालेल्या सभेत ठरविण्यात आलेले आहे. 
🔰 त्या नुसार जनता कर्फ्यू दरम्यान खालीलप्रमाणे सेवा सुरु राहतील. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे :

1. दिनांक 25/09/2020 ते दिनांक 01/10/2020 पर्यत खालील सेवा नियमितपणे सुरु राहतील :
अ) सर्व दवाखाने व ओषधी दुकाने, कृषी केन्द्र, सर्व शासकीय कार्यालय, बँक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत ओद्योगिक आस्थापना (कार्यालयीन दिवशी)

ब) घरपोच सेवासह दुध वितरण, वर्तमान पत्र, पेट्रोल पंप व हॉटेल मधुन Delivery Boy व्दारे घरपोच सेवा सुरु राहील.

2. दिनांक 25/09/2020 रोजी शुक्रवार ते दिनांक 01/10/2020 रोजी गुरूवार पर्पत वरील प्रमाणे सेवा सुरु राहतील त्याव्यतिरिक्त सर्व किराना दुकान, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना/दुकाने उपरोक्त कालावधीत बंद राहतील.

टिप : उपरोक्त कालावधीत वरील सुविधा सोडून चंद्रपुर जिल्हयातील सर्व पानठेला/चहाटपरी व हातगाडी,फुटपाथ वरील चायनीजसह इतर सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना बंद राहतील,

वरील प्रमाणे कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरीक / लोकप्रतिनिधी व इतर सर्व दुकानदार यांनी स्वयंघोषीत जनता पाळून नागरीकांच्या सुरक्षतेसाठी सहकार्य करावे असे विनंती पत्र जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी जाहीर केले आहे.