ब्रेकिंग ईशारा : पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता : गोसेखुर्द परिसर, वैनगंगा नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे : जिल्हा प्रशासन #Heavy rainfall is predicted in a catchment area of Gosikhurd Dam - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग ईशारा : पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता : गोसेखुर्द परिसर, वैनगंगा नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे : जिल्हा प्रशासन #Heavy rainfall is predicted in a catchment area of Gosikhurd Dam

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून गोसेखुर्द परिसर, वैनगंगा नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा ईशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे
🔰तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

🌧️ बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टी दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग ते उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आज (शुक्रवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 
⛈️ राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने अनेक भागात उघडीप दिली आहे. काही भागात पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. त्यामुळे काही अंशी ढगाळ हवामान राहत असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात पावसाचा जोर कमी असला तरी इतर भागात कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यातच परतीच्या पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती तयार होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत असून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणाची स्थिती तयार होत आहे.
🌧️ उद्या (शनिवारी) कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर विदर्भात व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील. रविवारी (ता. २०) व सोमवारी (ता. २१) कोकण व मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.तर मराठवाडा व विदर्भात काही भागात पावसाचा शिडकावा होईल.🛑WARNING🛑

Heavy rainfall is predicted in a catchment area of Gosikhurd Dam, Hence Discharge through dam can be increase.
⚡ कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल..