महिलेला अश्लील विडिओ पाठवल्या प्रकरणी सिरोंचा पंचायत समितीच्या सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल #gadchiroli - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महिलेला अश्लील विडिओ पाठवल्या प्रकरणी सिरोंचा पंचायत समितीच्या सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल #gadchiroli

Share This
खबरकट्टा / गडचिरोली - 
सिरोंचा पंचायत समिती मध्ये कार्यरत सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्या विरोधात महिला परिचरास मोबाईलवर अश्लील विडिओ पाठवल्या प्रकरणी सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सुधाकर निमसरकार वय 59 असे आरोपीचे नाव आहे.
निमसरकार याने महिला परीचरास 21 सप्टेंबर ला संध्याकाळी मोबाईल वर अश्लील विडिओ पाठविला त्यांनतर महिला चांगलीच संतापली व झालेला प्रकार आपल्या पतीला सांगितला त्यानंतर सिरोंचा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. 
त्या तक्रारी नुसार सिरोंचा पोलीस ठाण्यात भा.दं. वि 509 अ,354ड,509 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1965 कलम 65 माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67,67अ नुसार 23सप्टेंबर ला गुन्हा दाखल झाला असून तपास प्रभारी अधिकारी अजय अहिरकर करत आहेत.आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.