गोसीखुर्द धरणांचे पाणी अचानक पणे वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आले. अशा प्रकारच्या कृत्रिम पुरामुळे नाल्यांच्या काठांवर असलेली मॉं वैष्णोदेवी माता राईस मिल व वैष्णव देवी स्टीम राईस इंडस्ट्री चे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.या राईस मिल मध्ये उच्च दर्जाचे तांदूळ पिसाई केले जाते.या राईस मिल मध्ये अनेक कामगार सुध्दा काम करून आपल्या कुटुंबातील उपजिविका चालवतात.
अशामध्ये २९ संप्टेबरला कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता गोसीखुर्द धरणांचे पाणी सोडण्यात आले.त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने राईस मिल मधील करोडो रुपयांचा माल बाहेर काढता आले नाही.त्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आणी संपुर्ण राईस मिल परिसरात दहा-पंधरा फुट पाणी साचल्याने राईस मिल मध्ये असलेले तांदुळ धान, बारदाना, कुक्कस चावल खंडा यांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.
शेड मधील लाखो रुपयांचा कोंडा वाहुन गेला आहे. एवढेच नव्हे तर राईस मिल मधील इलेक्ट्रिक मोटार मशीनरीज खराब झाल्यामुळे परत राईस मिल सुरू करण्यासाठी मॉं वैष्णोदेवी माता राईस मिल ला करोडो रुपयांचा खर्च आणि कालावधी सुध्दा लागणार आहे.कुत्रिम पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सुध्दा राईस मिल मालकांना सोसावं लागणार आहे.आणि कामगार यांचें सुध्दा खर्च मॉं वैष्णोदेवी माता राईस मिलला बसणार आहे.
गोसीखुर्द धरणांचे पाणी कोणत्याही पुर्व सुचना न करता सोडण्यात आल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.हा नैसर्गिक पुर नसुन या कृत्रिम पुरामुळे मिल चे खुप नुकसान झाले आहे.-रमेश अग्रवाल( मॉं वैष्णोदेवी माता राईस मिल) मालक