गोसीखुर्द धरणांचे पाणी अचानक वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील नदी काठावरील गावांमध्ये महापुरांची परिस्थिती निर्माण झाली.अनेकांचे घरे पडली व जनावरे मुत्युमुखी पडले आणि घरातील अन्नधान्य पुरांच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले.
प्रशासनाने योग्य प्रकारे सर्व पुरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढून त्यांच्या निवासाची व्यवस्था नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय येथे करण्यात आली आहे.
ब्रम्हपुरी शहरात २५ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजकार्य करत असलेले विदर्भ माझा पार्टी चे संयोजक अशोकजी भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली काल नगरसेवक सतीश हुमणे ,नगरसेवक गौरव भैय्या , नगरसेविका अर्चना खंडाते, नगरसेविका अंजली उरकुडे , नगरसेविका सपना खेत्रे , रूपाली रावेकर तथा एन सी सी चे विद्यार्थी यांच्या सहकार्याने सर्व पुरग्रस्तांना रोज सकाळी नास्ता चाय बिस्कीट व फळं देण्यात येत आहेत.