विविध प्रतिबंधात्मक उपायांसोबतच अॅन्टिजेन व आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढवूनही चंद्रपुरात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. शासकीय रूग्णालये फुल्लं झाली तर खासगी आरोग्य व्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर आहे. शहरात आतापर्यंत 55 डॉक्टरांना बाधा झाली. यातील एका डॉक्टराला वर्धा-सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेत हलविण्यात आले आहे. बाधित आणि मृतकांच्या संख्येत दिवसागणिक होणाऱ्या वाढीने जिल्हा हादरला आहे.
कोरोना लपवून ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने ‘अर्ली डिटेक्शन’ म्हणजे लवकर निदान करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाची लक्षणे वाढायच्या आधीच संयशित रूग्ण, त्यांच्या कुटुंबातील, संपर्कातील व हाय रिस्क सदस्य अशा सर्वांचीच चाचणी सुरू केली.
याशिवाय आयएलआय व सारी आदी सर्वेक्षण करून कोरोना स्प्रेड रोखण्याचे प्रयत्न केल्या जात आहेत. लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांच्या रूग्णांना अनुक्रमे कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएच) व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) मध्ये उपचारासाठी २३ संस्था निश्चित केल्या. भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, वरोरा, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड व सावली आदी नऊ तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू झाले. पण, तेदेखील अपुरे पडल्याची शक्यता आहे.
🔰 कोविड हेल्थ केअर्ससाठी खाजगी रुग्णालये
1(स्पंदन हॉस्पिटल,
2)बुक्कावार हार्ट अॅण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल,
3)पंत हॉस्पिटल,
4)श्वेता हॉस्पिटल,
5)क्राईस्ट हॉस्पिटल,
6)वासाडे नर्सिंग होम,
7)बेंदले हॉस्पिटलचा
8) डिसीएच हॉस्पिटल,
9)क्राईस्ट हॉस्पिटल १,
10)मानवटकर हॉस्पिटल,
11)शिवजी हॉस्पिटल (पेड्रियाट्रिक),
12)मेहरा हॉस्पिटल,
13)आस्था हॉस्पिटल,
14)सैनानी हॉस्पिटल,
15)नगराळे हॉस्पिटल,
16)गुरूकृपा मनोलक्ष्मी नर्सिंग होम व
17)गुलवाडे (एनसी मदरर्स) आदी हॉस्पिटल्सचा समावेश आहे.
मात्र, रूग्णांना बेड्स मिळणे कठीण झाले आहे.
🔰 ऑक्सिजनची स्थिती ही कमजोर :
शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालयात ११० जम्बो तर १५० लहान आक्सिजन सिलिंडर आहेत. आठ दिवसात आणखी ३०० जम्बो आक्सिजन सिलिंडर येणार आहेत. १३ केएलचे लिक्विड ऑक्सीजनचे दोन प्लॉन्ट दोन आठवळ्यात सुरू होणार आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.
🔰 जिल्ह्यात ३ हजार २०३ बेड्स उपलब्ध
जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून ३ हजार २०३ बेड्स उपलब्ध आहेत. आणखी आठ खासगी रूग्णालये ताब्यात घेण्यात येणार आहे. यातून २१७ बेड्सची व्यवस्था होणार आहे. शासकीय महिला रूग्णालयात ५०० पेक्षा जास्त बेड्स उभारण्याचे काम सुरू आहे.
🔰 सहापैकी दोन खासगी लॅब बंद
चंद्रपूर शहरात डॉ. बोबडे, डॉ. कोल्हे, डॉ. मेहरा, डॉ. गुलवाडे, डॉ. गांधी, डॉ. गावतुरे लॅबमध्ये अॅन्टिजेन चाचणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व महानगर पालिकेने परवागनी दिली. परंतु, अॅन्टिजेन चाचणी किटचा तुटवडा असल्याने चारपैकी डॉ. गुलवाडे व डॉ. गांधी या दोन लॅबमधील चाचण्या बंद करण्यात आल्या.
रूग्णांची संभाव्य संख्या लक्षात घेवून आणखी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स वाढविण्यात येणार आहेत. बेड्स, ऑक्सिजन, डॉक्टरर्स, वैद्यकीय कर्मचारी व अन्य सुविधा वैद्यकीय सुविधांची कमरता जाणवू नये, याकडे लक्ष आहे. महिला रूग्णालयाचे विस्तारीकरण दोन आठवड्यात पूर्ण होईल. नागरिकांनी घाबरू नये मात्र काळजी घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
चंद्रपूर शरीरातील आयएमएशी निगडीत व अन्य खासगी डॉक्टरर्सही धोका पत्करून कोरोना रूग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अत्यावश्यक आरोग्य पुरवून अडचणी दूर केले पाहिजे. नागरिकांनीही अर्धवट व चुकीच्या माहिती डॉक्टरांना लक्ष्य करू नये. खासगी डॉक्टरांनाही आरटीसीपीआर चाचणीची परवानगी देण्याची गरज आहे.-अनिल माडुरवार, अध्यक्ष, आयएमए शाखा, चंद्रपूर