जनता कर्फ्यू संपल्याबाबत संभ्रम कायम : वाढती पॉसिटीव्ह संख्या : जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी सूचना नाही #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जनता कर्फ्यू संपल्याबाबत संभ्रम कायम : वाढती पॉसिटीव्ह संख्या : जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी सूचना नाही #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -


चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता कोरोना बाधितांचा आकडा लक्षात घेता चंद्रपूर शहर व बल्लारपूर येथे दिनांक 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवार पर्यंत व्यापारी संघांच्या स्वयंस्फुरतेने कडकडीत ऐच्छिक लॉकडाऊन - जनता कर्फ्यू पाळण्यात आला. 


या जनता कर्फ्यू दरम्यान सुद्धा चंद्रपूर शहरात 500 पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून आले व 7 मृत्यू झाले. चंद्रपूर शहरातील जनतेनी कम्मुनिटी स्प्रेड चा धोका लक्षात घेत कडकडीत गेले 4 दिवस बंद पाडला तरी साखळी खंडित न झाल्याचे चित्र आहे. 


अश्यातच आज संपणाऱ्या जनता कर्फ्यू नंतर उद्यापासून सर्व सुरु राहील किंवा नेमके काय सुरु बंद याबाबत प्रशासनाने कोणतीही जाहीर सूचना जारी न केल्याने शहरातील जनतेत संभ्रम चर्चा आहे. 


कोविड-19 च्या प्रादुर्भावासोबतच इतरही डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया सारखे रोग बळावल्याने प्रत्येक 4 घर सोडून घरी कोणता न कोणता रुग्ण आहे. शिवाय शहरात दररोज 100 पेक्षा अधिक बाधित रुग्ण उघड होत आहेत. अश्यात आवश्यकतेशिवाय बाहेर न पाडण्यासाठी प्रशाशनाकडून नियमावली / खबरदारी सूचना जारी करणे अपेक्षित होते. 


उद्या संचार सुरु झाल्यावर दुकान / बाजार / सार्वजनिक ठिकाणी गर्दी उसळून नकळत लागण होऊ नये याकरिता शेवटी काय आपली सुरक्षा आपल्या हाती म्हणून काळजी घ्या.